Ashvin Rural

अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल मांचीहिल, आश्वी बु।।, ता.संगमनेर जि.अहिल्यानगर बालरोग (कौमारभृत्य) विभाग आयोजित सुवर्ण प्राशन संस्कार / शिबीर दि.०७/०४/२०२५ वार सोमवार, वेळ १० ते ०५ या वेळेत पार पडले. सुवर्णप्राशन हे लहान मुलांच्या शारीरिक विकासासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असते. हा संस्कार वय वर्ष ० ते १२ वयोगटातील मुलांना प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्रात देण्यात येतो, या औषधामध्ये सोने, मध, तूप आणि औषधी वनस्पती यांचे मिश्रण असते. सदर शिबिरात डॉ.जयप्रकाश खैरनार, डॉ.निलम हांडे, डॉ. अमेय गुणे, डॉ.विक्रम शेलवले, डॉ.अमृता धनेश्वर, डॉ.संतोष काळबांडे व तसेच इंटर्न व पी जी विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर शिविराचे ठिकाण आश्वी बु, आश्वी खु, शिबलापूर, निमगावजाळी व अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल मांचीहिल. मध्ये पार पडले.सदर शिबिरामध्ये ० ते १२ वयोगटातील २१८ मुला-मुलींनी या शिबिराचा लाभ घेतला.