शिवगर्जना 2025
आज दिनांक 17 मार्च 2025 रोजी अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालय मांची हिल संगमनेर येथे तिथीनुसार शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . हा कार्यक्रम Student council व cultural committee च्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात वेशभूषा धारण केलेले छ. शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या आगमनाने झाली. कार्यक्रमासाठी आपल्या महाविद्यालयाचे डायरेक्टर मा.श्री. बलमे सर, अध्यक्ष वैद्य लोखंडे सर, महाविद्यालयाच्या प्राचार्या वैद्या निर्मळ मॅडम,उपप्राचार्य वैद्य शिंपी सर, शिक्षक गण व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थीती होती. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध शिवव्याख्याते व पशुविकास अधिकारी डॉ. महेश विठ्ठल पारखे सर हे उपस्थित होते. मान्यवरांच्या आगमनानंतर त्यांचे स्वागत व सत्कार समारंभ पार पडला.पुढील कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व शिव आरती करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाचा मुख्य भाग म्हणजे शिवव्याख्याण पार पडले.त्या व्याख्यानात छ. शिवाजी महाराजांचे संपूर्ण आयुष्य व त्यांच्या विचारांना श्रोत्यांपर्यंत पोहचवण्याचा निष्ठेने डॉ. पारखे यांनी प्रयत्न केला. व्याख्याना नंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा लाभ घेतला.त्या पश्चात संस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते त्यामध्ये नृत्य, पोवाडा,भाषण या सर्वांचा समावेश होता. शेवटी महाराजांचा पालखी सोहळा व मिरवणूक काढण्यात आली.अशा प्रकारे शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली व कार्यक्रमाची सांगता श्रावणी पाटील हिने आभार प्रदर्शनाच्या माध्यमातून केली.