राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष, मा.उप मुख्यमंत्री (गृह / विधी व न्याय) कार्यालय, मुंबई, महाराष्ट्र शासन व अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज व धर्मादाय हॉस्पिटल यांच्या वतीने दिनांक :- ०६/१०/२०२४ रोजी शिबिराचे ठिकाण :- हनुमान मंदिर, आश्वी बुद्रुक, संगमनेर येथे सर्वरोगनिदान शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये १३५ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराला हॉस्पिटल अधीक्षक डॉ.राजन कुलकर्णी, डॉ.अमित ढोले, डॉ.निशांत इंगळे, डॉ.गीता दातीर,डॉ. शुकाचार्य वाघमोडे, डॉ.शिवपाल खंडीझोड, डॉ.संजय बालोटे, प्रवीण कडू सर, विकास मुन्तोडे, प्रशांत फणसे, रोहित तांबे, दिलीप खरात, रोहित मते, राहुल पिंपळे, रवी बर्डे व ग्रामपंचायत कार्यालय, आश्वी बुद्रुक, यांचे सर्व स्टाफचे सहकार्य या शिबिरास लाभले.