Ashvin Rural

अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल यांच्या वतीने स्त्रीरोग विभागाच्या अंतर्गत दि.११/०७/२०२४ रोजी “ गर्भसंस्कार शिबीर “ आयोजित करण्यात आले. या शिबिराचे प्रास्ताविक डॉ.पाचोरे मॅडम यांनी केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.शामल निर्मळ मॅडम व अधीक्षक डॉ. राजन कुलकर्णी सर यांनी शिबिरामध्ये सहभागी झालेल्या गर्भिणींना मार्गदर्शन केले. या शिबिराअंतर्गत १८ महिलांना गर्भसंस्कार बाबत माहिती देण्यात आली तसेच व ५ अशक्त महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच एकूण २३ महिलांचा शिबिरात सहभाग नोंदविला गेला. तसेच योगा शिक्षक श्री.लेंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली योगा प्रात्यक्षिक करून देण्यात आले. गर्भिणींची तपासणी करून औषधे, रक्त तपासणी,  पोषक सामग्री वाटप करण्यात आली. या शिबिराला मा.अधीक्षक डॉ.कुलकर्णी सर, प्राचार्य डॉ.निर्मळ मॅडम, डॉ.सरोदे मॅडम, डॉ.पाचोरे विशाखा मॅडम, डॉ.शुकाचार्य वाघमोडे सर, डॉ.संजय बालोटे, स्त्रीरोग विभागातील पीजी विद्यार्थी, सौ.सोनाली मुन्तोडे व सर्व स्टाफ यांचे विशेष सहकार्य शिबिरास लाभले.