शिबिराचे ठिकाण रायजिंग स्टार नर्सरी स्कूल, ता. श्रीरामपूर. जि. अहमदनगर येथे शुक्रवार दि. ३१/०५/२०२४ रोजी सकाळ 10 ते ५ या वेळेत पार पडले. सदर शिबिराचे उद्घाटन हे उपप्राचार्य श्री. डमाळे सर यांच्या हस्ते झाले. सदर शिबीर शिबिराचे ठिकाण रायजिंग स्टार नर्सरी स्कूल, ता. श्रीरामपूर. व अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले. सदर शिबिरासाठी तज्ञ डॉ. संजीव लोखंडे, डॉ. राजन कुलकर्णी , डॉ. शिवपाल खंडीझोड, डॉ. अविनाश जाधव, डॉ. दिनेश जाधव, डॉ. निशांत इंगळे, डॉ. शुकाचार्य वाघमोडे आय टेक्निशियन रोहित मते आदि डॉक्टर उपस्थित होते. सदर शिबिरासाठी हॉस्पिटल कर्मचारी तसेच इंटर्न विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर शिबिरामध्ये ५३ रुग्णांनी लाभ घेतला.