Ashvin Rural

NCISM द्वारे निर्देशित द्वितीय वर्ष BAMS च्या द्रव्यगुण विज्ञान या विषयाच्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांनी औषधी वनोद्यानास भेट देउन त्याची माहिती घेणे आवश्यक असते. त्याप्रमाणे द्रव्यगुण विज्ञान विभाग, अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालय, मांची हिल च्या वतीने द्वितीय वर्ष BAMS च्या विद्यार्थ्यांसाठी वनौषधी उद्यान, आयुर्वेद सेवा संघ, नाशिक” येथे भेटीचे आयोजन दि.१७/११/२०२२ रोजी करण्यात आले होते. दुपारी २ ते ४ या दरम्यान सदर भेट संपन्न झाली. या भेटीसाठी द्रव्यगुण विज्ञान विभागातील प्रपाठक वैद्या मोनिका पापरीकर , सहाय्यक प्राध्यापक वैद्य तुषार देशपांडे तसेच अध्यापकेतर कर्मचारी श्री संजय आंधळे हे उपस्थित होते. आयुर्वेद महाविद्यालयाच्या द्रव्यगुण विभागातील प्राध्यापक वैद्य देवदत्त देशमुख व अन्य सहकारी वैद्य यांनी विद्यार्थ्यांना वनौषधी उद्यान मधील औषधी वनस्पती तसेच इतर दुर्मिळ वनस्पती याविषयी उत्तमप्रकारे मार्गदर्शन केले.

वनौषधी उद्यान भेटीमध्ये असे निदर्शनास आले कि, विविध औषधी वनस्पतींचे संगोपन आणि संवर्धन अतिशय चांगल्या पद्धतीने केले आहे. अनेक वनस्पती ३० ते ३५ वर्षांपासून आहेत तर काही नवीन लागवडी सुद्धा आहेत. जवळपास २६५ वनस्पतींचे Species आणि एकूण १०६५ वनस्पती उद्यानात आहेत. दुर्मिळ वनस्पतींमध्ये वरुण, सर्पगंधा, गुंजा, कुपिलू, शेंदरी, नागरमोथा, कमळ इत्यादी वनस्पती जतन केलेल्या आहेत. या व्यतिरिक्त विविध पुष्पवृक्ष जसे काटेसावर, चित्रक, चाफा सुद्धा पाहण्यात आले. त्याचप्रमाणे विविध जाती प्रजाती सुद्धा आढळून आल्या.  

विद्यार्थ्यांना आयुर्वेदीय औषधी वनस्पती लागवडी आणि जोपासण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.

            आयुर्वेद महाविद्यालयाच्या द्रव्यगुण विभागातील प्राध्यापक वैद्य देवदत्त देशमुख  व आयुर्वेद सेवा संघ आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य वैद्य विनय सोनांबेकर यांनी या भेटीसाठी परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे आभार. तसेच औषधी भवन मधील आयुर्वेद फार्मसी चे वैद्य प्रसाद पण्डित व अन्य सहकारी वैद्य यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचेहि अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालय, मांची हिल च्या वतीने आभार.