Ashvin Rural

अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज & हॉस्पिटल, मांचीहिल, आश्वी बुद्रुक, संगमनेर यांच्या वतीने दि.२७/०९/२०२४ रोजी सुवर्ण प्राशन संस्कार शिबीर आयोजित करण्यात आले, सदर शिबीर हे वेगवेगळ्या गावांत घेण्यात आले, ती गावे पुढीलप्रमाणे आश्वी खुर्द, आश्वी बुद्रुक, शिबलापूर, मालुंजे, डिग्रस, शेडगाव. पानोडी, कनोली व अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज & हॉस्पिटल, मांची हिल, आश्वी बुद्रुक, संगमनेर. सदर शिबिरामध्ये ० ते १२ वयोगटातील एकूण ४५३ मुला-मुलींना सुवर्ण प्राशन शिबिराचा लाभ देण्यात आला. शिबिरासाठी हॉस्पिटल मधील डॉ.विक्रम शेलवले, डॉ.जयप्रकाश खैरनार, डॉ.शुकाचार्य वाघमोडे, आंतरवासियता विद्यार्थी (इंटर्न), पदव्युत्तर विद्यार्थी (पीजी), बालरोग विभाग प्रमुख श्री.प्रशांत फणसे यांचे सहकार्य लाभले.