अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल, मांचीहिल, आश्वी बुद्रुक, संगमनेर मध्ये बालरोग विभाग आयोजित सुवर्णप्राशन संस्कार शिबीर दि.२४/१०/२०२४ रोजी आयोजित केले होते. सुवर्णप्राशन हे लहान मुलांच्या शारीरिक विकासासाठी आणि रोगप्रतिकारक शाक्री वाढविण्यासाठी उपयुक्त असते. हा संस्कार वय वर्ष ० ते १२ वयोगटातील मुलांना प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्राला देण्यात येतो, या औषधामध्ये सोने, मध, देशी गायीचे शुद्ध तूप, आणि औषधी वनस्पती यांचे मिश्रण असते. सदर शिबिरात डॉ.जयप्रकाश खैरनार, डॉ.अमेय गुणे, डॉ.विक्रम शेलवाले व बालरोग विभा प्रमुख प्रशांत फणसे व इंटर्न, पीजी विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य या शिबिरास लाभले. सदर शिबिराची ठिकाणे आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, शिबलापूर, डिग्रस, मालुंजे, प्रतापपूर, शेडगाव, कनोली, निमगाव जाळी, तसेच अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल, मांची हिल, आश्वी बुद्रुक, संगमनेर मध्ये पार पडले. सदर शिबिरामध्ये ० ते १२ वयोगटातील ४२४ मुला-मुलींना या शिबिराचा लाभ देण्यात आला.