अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज & हॉस्पिटल, मांची हिल, आश्वी बुद्रुक, संगमनेर यांच्या वतीने बुवाजीबाबा देवस्थान यात्रोत्सव व पालखी सोहळा निमित्त सर्वरोग निदान शिबीर व नेत्ररोग तपासणी शिबिर मौजे डिग्रस, ता.संगमनेर येथे दि.२०/१२/२०२४ व दि. २१/१२/२०२४ या कालावधीत पार पडले. शिबिराचे उद्घाटन हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ.राजन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. शिबिरामध्ये (पहिला दिवस १०० व दुसरा दिवस ८०) अशा एकूण १८० रुग्णांची तपासणी करण्यात आली तसेच औषधी वाटप करण्यात आले. सदर शिबिरासाठी डॉ.राजन कुलकर्णी, डॉ. शिवपाल खंडीझोड, डॉ.शुकाचार्य वाघमोडे, डॉ.निशांत इंगळे, डॉ.संजय बालोटे, डॉ.तेजस्विनी मोरे, डॉ.गिता दातीर, डॉ.प्रियंका मेहेर, डॉ.अंकिता काळे, डॉ.ज्योती खंदारे, डॉ.विक्रम शेलवले, श्री.रोहित मते, श्री.राहुल पिंपळे, श्री.रमेश शिरतार, श्री. प्रशांत वाघचौरे, श्री.प्रवीण कडू, श्री. प्रशांत फणसे, सौ.हिराबाई खेमनर, पदव्युत्तर विद्यार्थी (PG), आंतरवासियता विद्यार्थी (Interns) तसेच समस्त ग्रामस्थ डिग्रस, मालुंजे, साकुर, पानोडी व ग्रामपंचायत कार्यालय मौजे डिग्रस, संगमनेर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.