Ashvin Rural

अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज & हॉस्पिटल, मांची हिल, आश्वी बुद्रुक, संगमनेर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वरोग निदान शिबीर दि.१८/०८/२०२४ रोजी आयोजित केले होते. शिबिराचे उद्घाटन हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ.राजन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रुग्णांना डॉ.संजीव लोखंडे यांनी दैनंदिन आहार-विहार, व्यायाम याविषयी मार्गदर्शन केले. शिबिरामध्ये एकूण ११९ रुग्णांची तपासणी करण्यात आली तसेच औषधी वाटप करण्यात आले. सदर शिबिरासाठी डॉ.संजीव लोखंडे, डॉ.राजन कुलकर्णी, डॉ.अविनाश जाधव, डॉ. शिवपाल खंडीझोड, डॉ.शुकाचार्य वाघमोडे, प्रा.दत्ता शिंदे, संस्थेचे अध्यक्ष श्री.विजय पिसे, डॉ.निशांत इंगळे, डॉ.तेजस्विनी मोरे, डॉ.गिता दातीर, श्री.रोहित मते, श्री.विकास मुन्तोडे, श्री.दिलीप खरात,  श्री.राहुल पिंपळे, श्री.रमेश शिरतार, श्री. प्रशांत वाघचौरे, श्री.प्रवीण कडू, श्री. प्रशांत फणसे, सौ.हिराबाई खेमनर, पदव्युत्तर विद्यार्थी (PG), आंतरवासियता विद्यार्थी (Interns) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.