Ashvin Rural

दिनांक २२ मार्च २०२४  रोजी संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाज हॉल, जिजामाता शाळेचे पटांगण सातपूर, नाशिक  येथे मोफत सर्वरोग तपासणी शिबीर  पार पडले. शिबिराचे उद्घाटन जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष किसान खताळे, तसेच उपाध्यक्ष शाताराम जमधाडे व निवृत्त पी.एस. आय  यांच्या हस्ते झाले. सदर शिबीर संजीवनी क्लिनिक नाशिक व अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल मांची हिल आश्वी बु. यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले. सदर शिबिरासाठी डॉ. संजीव लोखंडे,ल डॉ. शिवपाल खंडीझोड, डॉ. दिनेश पानगव्हाणे, डॉ. अविनाश जाधव, डॉ. मानसी देशमुख, डॉ. विद्या सरोदे, डॉ. तेजस्विनी मोरे, डॉ. शुकाचार्य वाघमोडे उपस्थित होते.सदर शिबिरासाठी हॉस्पिटल कर्मचारी राहुल पिंपळे, प्रशांत वाघचौरे, अक्षय मनकर, सोनाली जोंधळे, शुभांगी कहार. तसेच पि. जि. विद्यार्थी व इंटर्न विद्यार्थी उपस्थित होते. सदर शिबिरामध्ये एकूण १६४ रुग्णांवर मोफत तपासणी व उपचार करण्यात आले.