Ashvin Rural

मोफत मुळव्याध,  फिशर व भगंदर तपासणी शिबीर हे गुरुवार दि . ३०/०५/२०२४ रोजी  ओम चैतन्तय कानिफनाथ मंदिर तळेगाव दिघे ता. संगमनेर जी अहमदनगर येथे  पार पडले. सदर शिबिराचे उद्घाटन हे तळेगाव दिघे गावाचे सरपंच यांच्या हस्ते झाले. सदर शिबिरासाठी तज्ञ डॉक्टर शिवपाल खंडीझोड, डॉ. संजयकुमार धोंडे, डॉ. दिनेश पानगव्हाणे, डॉ. हर्षदा बावा, डॉ. पवन इंगळे, डॉ.मतीन शेख, डॉ. विशाल ताम्हाणे, डॉ. शाम पाटील , डॉ. सुषमा खंडीझोड अदि डॉक्टर उपस्थित होते. सदर शिबिरामध्ये येणाऱ्या रुग्णांनी मुळव्याध, फिशर तसेच भगंदर , त्वचा विकार हार्निया , शरीरावरील चरबीच्या गाठी, इ. व्याधीवर उपचार तसेच मोफत सल्ला याचा लाभ घेतला.

सदर शिबिरासाठी हॉस्पिटल कर्मचारी तसेच इंटर्न विद्यार्थी यांचे मोलाचे योगदान लाभले