अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज & हॉस्पिटल, मांची हिल, आश्वी बुद्रुक, संगमनेर येथे पोषण आहार शिबीर दि.०६/०९/२०२४ रोजी आयोजित केले होते. शिबिराचे उद्घाटन हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ.राजन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. शिबिरामध्ये सहभागी झालेल्या मुलांच्या मातेला पोषण आहारा विषयी माहिती देण्यात आली व त्यांना पोषण आहार कीट वाटप करण्यात आली. तसेच औषधी वाटप करण्यात आले. शिबिरामध्ये एकूण ११ मुला-मुलींची तपासणी व उपचार करण्यात आले. सदर शिबिरासाठीडॉ.जयप्रकाश खैरनार, डॉ.महेश जाधव, डॉ.अमेय गुणे, डॉ.विक्रम शेलवले, डॉ.नीलम हांडे, डॉ.राजन कुलकर्णी, डॉ.शुकाचार्य वाघमोडे, श्री.प्रशांत फणसे, पदव्युत्तर विद्यार्थी (PG), आंतरवासियता विद्यार्थी (Interns) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.