Ashvin Rural

          अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय  मांची हिल, आश्वी बु. ता. संगमनेर येथे बुधवार दिनांक १० जुलै २०२४ रोजी बहिस्थ: व्याख्यानमाले अंतर्गत ‘नाडी परीक्षण’ या विषयावर मुंबई येथील प्रसिद्ध नाडीगुरु आचार्य डॉ. संजयकुमार छाजेड यांचे आयुर्वेद स्नातकासाठी व्याख्यानाचे आयोजन केले होते. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी पूजनाने झाली. प्रसंगी प्रमुख पाहुण्याबरोबरच संस्थेचे  उपाध्यक्ष अण्णासाहेब बलमे, प्राचार्य डॉ. श्यामल निर्मळ, उपप्राचार्य डॉ. शिवपाल खंडीझोड, डॉ. जितेंद्र शिंपी, डॉ. चंद्रकांत गिरगुणे, डॉ. राजन कुलकर्णी, डॉ. विशाखा पाचोरे, डॉ. प्रियंका वर्पे, डॉ. गौरव डोंगरे, डॉ. तुषार देशपांडे, डॉ. विक्रम शेलवले, डॉ. चंद्रकांत शिंदे, डॉ. प्रियंका मेहेर, डॉ. अंकिता काळे, डॉ. ज्योती खंदारे, डॉ. पूजा देशपांडे, डॉ. नेहा गावकर, डॉ. जयश्री कोल्हे, डॉ. शर्वरी डोंगरे, डॉ.मनाली देशमुख, डॉ. मानसी देशमुख, डॉ. निशांत इंगळे , डॉ. शिवांजली राऊत, डॉ. अंजली पी.पी., डॉ. मधुबाला गोपीनाथ, डॉ. गीता दातीर, डॉ. मंदार भणगे, डॉ. दीपा भणगे, डॉ. नंदू गोडगे  आदि व्यासपीठावर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्याचा प्राचार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. छाजेड यांनी नाडी परीक्षणाचे आयुर्वेदातील महत्व अतिशय मार्मिक भाषेत विवध प्रात्यक्षिकासह उपस्थितांना पटवून दिले. रोग्याची परीक्षा करताना नाडी परीक्षण किती आवश्यक आहे. रोग्याच्या शरीरातील वात, पित्त आणि कफ याची स्थिती, आजाराची परीक्षा आपण कोणतीही टेस्ट न करता नाडी परीक्षणाद्वारे करू शकता. त्यामुळे आयुर्वेद स्नातकानी आयुर्वेद शास्त्रा बरोबरच नाडी परीक्षणाचे तंत्र अवगत करणे अतिशय निकडीचे आहे. नाडी परीक्षण आजच्या धकाधकीच्या जीवनात काळाची गरज आहे असे प्रतिपादन डॉ. छाजेड यांनी याप्रसंगी केले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. श्यामल निर्मळ यांनी डॉ. छाजेड यांचे स्वागत केले. डॉ. मधुबाला व डॉ. प्रियंका वर्पे  यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर डॉ. अंकिता काळे  यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रम रूपरेषा डॉ. पूजा देशपांडे तर आभार डॉ. ज्योती खंदारे यांनी मानले. महाविद्यालयातील प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्ष बी.ए.एम.एस., पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.