स्वापक नियंत्रण ब्युरो, भारत आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक तसेच राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १२/०६/२०२३ ते २६/०६/२०२३ या कालावधी मध्ये नशा मुक्त भारत अभियान अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालय मांची हिल संगमनेर या ठिकाणी राबविण्यात आले. या अभियानांतर्गत सेमिनार हॉल येथे सकाळी ११:३० ते १२:३० या वेळेत महाविद्यालायाचे उपप्राचार्य वैद्य जितेंद्र शिंपी सर यांनी सर्व विद्यार्थी, कर्मचारी आणि शिक्षकगण यांना माहितीपर प्रबोधन केले. विविध नशा करणाऱ्या सवयींमध्ये मोबाईल फोन नशा म्हणजेच “नोमोफोबिया” या बद्दल विस्तृत माहिती दिली. सदर कार्यक्रमामध्ये प्रभारी प्राचार्या वैद्या श्यामल निर्मळ मॅडम, क्रीयाशारीर विभागाचे प्रमुख वैद्य चंद्रकांत गिरगुने सर, रासेयो चे समन्वयक वैद्य गौरव डोंगरे सर आणि द्रव्यगुण विभागाचे अधिव्याख्याता वैद्य तुषार देशपांडे सर उपस्थित होते. या प्रसंगी सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी नशामुक्ती संदर्भातील प्रतिज्ञा घेतली. तसेच भारत सरकारच्या Online Portal वरील E-Pledge हि सर्वांकडून करून घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्य तुषार देशपांडे आणि आभार प्रदर्शन वैद्य गौरव डोंगरे सर यांनी केले आणि कार्यक्रमाची सांगता केली.