अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत अस्थमा शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये २३० रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला तसेच दमा, अस्थमा व्यतिरिक्त इतर आजार असणाऱ्या रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.श्यामल निर्मल, उपप्राचार्य डॉ.शिवपाल खंडीझोड, हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ.राजन कुलकर्णी यांनी रुग्णांना आहार-विहार, ऋतूनुसार आरोग्याची काळजी, दमा, अस्थमा यावर विशेष काळजी कशी घ्यायची व इतर विषयांवर रुग्णांना मार्गदर्शन केले. तसेच शिबिरासाठी हॉस्पिटलचे संचालक श्री.दत्ता शिंदे, डॉ.शुकाचार्य वाघमोडे, डॉ.संजय बालोटे, सर्जेराव कडू, प्रवीण कडू, प्रशांत वाघचौरे, रोहित तांबे, रोहित मते, प्रशांत फणसे, राहुल पिंपळे, ज्ञानेश्वर रक्टे, रवी बर्डे, जयश्री गोर्डे, हिराबाई खेमनर, सोनाली जोंधळे, सोनाली लोंढे, सोनाली देशमुख, पूजा तांबे, संदीप घोडके, छाया जोंधळे, कोमल वडीतके, शुभांगी कहार, व इतर सर्व स्टाफ चे सहकार्य या शिबिरास लाभले. संपूर्ण शिबिराचा कार्यक्रम रुग्णांस कोणताही विशेष त्रास न जाणवता व्यवस्थित पार पडला.