अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज & हॉस्पिटल, मांची हिल, आश्वी बुद्रुक, संगमनेर यांच्या वतीने श्री. संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी व श्री म्हसोबा महाराज उत्सव निमित्त माळी मळा, आश्वी बुद्रुक, ता. संगमनेर येथे सर्वरोग निदान शिबीर दि.०३/०८/२०२४ रोजी आयोजित केले होते. शिबिराचे उद्घाटन हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ.राजन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रुग्णांची मिफात आरोग्य तपासणी तपासणी करण्यात आली तसेच औषधी वाटप करण्यात आले. शिबिरामध्ये एकूण ९९ रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. सदर शिबिरासाठी डॉ.संजीव लोखंडे, डॉ.राजन कुलकर्णी, डॉ.अविनाश जाधव, डॉ. शिवपाल खंडीझोड, डॉ.शुकाचार्य वाघमोडे, प्रा.दत्ता शिंदे, श्री. प्रशांत वाघचौरे, श्री.प्रवीण कडू, श्री. प्रशांत फणसे, पदव्युत्तर विद्यार्थी (PG), आंतरवासियता विद्यार्थी (Interns) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.