श्री. दामोदर मालपाणी मेमोरियल ट्रस्ट, संस्कृत संवर्धन मंडळ व महाविद्यालय शाळा समूह योजना, संगमनेर केंद्र, संगमनेर नगरपालिका कला, दा.ज.मालपाणी वाणिज्य आणि ब.ना.सारडा विज्ञान महाविद्यालय(स्वायत्त), संगमनेर द्वारा आयोजित ‘संस्कृत विविध गुणदर्शन स्पर्धा’(जानेवारी २०२४) चा निकाल नुकताच जाहीर झाला. या स्पर्धेमध्ये अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, मांची हिल, आश्वी बु. ता. संगमनेर महाविद्यालयातील २३ विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा प्रकारात सहभाग घेतला होता. यामध्ये सांघिक स्पर्धा प्रकार – स्तोत्र पाठांतर स्पर्धेत प्रथम क्रमांक, सामुहिक स्तोत्र स्पर्धेत तृतीय क्रमांक, वैयक्तिक स्पर्धा प्रकार- कथाकथन स्पर्धेत मणेर नवीद शरीफ व कुरुंदकर मैथिली गणेश – चतुर्थ क्रमांक, काव्यगायन स्पर्धेत कोठारी अनन्या राकेश – पंचम क्रमांक, स्तोत्र पाठांतर स्पर्धेत पटारे नुतन तुकाराम – पंचम क्रमांक, पाटील ओमप्रसाद – उत्तेजनार्थ यांना पारितोषिक मिळाले असुन संगमनेर येथे विशेष समारंभात पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. सदर विद्यार्थ्यांना संस्कृत शिक्षक रावसाहेब काळे, प्रदीप जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक शाळीग्राम होडगर, संस्थेचे विश्वस्त डॉ. शैलेन्द्रसिंह होडगर, अध्यक्ष विजय पिसे, उपाध्यक्ष आण्णासाहेब बलमे, प्राचार्य डॉ. श्यामल निर्मळ, डॉ. संजीव लोखंडे, डॉ. जितेंद्र शिंपी, डॉ. चंद्रकांत गिरगुणे, प्र. अधिकारी दत्ता शिंदे व सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर वृंद यांच्यासह मांची हिल परिवाराकडून अभिनंदन करण्यात आले आहे.