Ashvin Rural

आधुनिक भारतातील समाज सुधारक ज्यांनी पुण्याला मुलींची पहिली शाळा सुरू केली.त्यांनी पत्नी सावित्रीबाईला शिक्षण देऊन तिला समाजामध्ये शिकवण्यासाठी सुशिक्षित बनवले, आणि देशातील पहिली शिक्षिका असण्याचा मान प्रदान केला, समाजाचे दगड धोंडे आपल्या अंगावर घेत या राष्ट्राला शिक्षणाचे महत्त्व सांगितले, अशे थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांची आज जयंती आहे. साताऱ्यातील कटगुण या गावी ११ एप्रिल १८२७ रोजी जोतिबा फुले यांचा जन्म झाला. आज दि.11/04/2023 रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त अश्विन ग्रामीण आयुर्वेदिक महाविद्यालयात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आला तरी या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन महाविद्यालयाचे प्राचार्य वैद्या. निर्मळश्यामल उपप्राचार्य वैद्य.   शिंपी सर वैद्य. खंडिझोड सर,  संस्थेचे उपाध्यक्ष मा. बलमे सर व महाविद्यालयाचे शिक्षकवृंद यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्याची देखील उपस्थिती होते.

             सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.संस्कृती ढगे यांनी केले तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाचा वैद्य कोलते मॅडम यानी केले. कार्यक्रमा प्रसंगी महाविद्यालयाचे वैद्य शिंपी सर  वैद्य.खंडीझोड सर व शशिकांत काळे सरांची अमूल्य असे मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थी मध्ये कु. श्रावणी आणि कू. हरी चव्हाण  कु.मकरंद गोरे, कु.गायत्री नकाते, कु.कौतुक गायकवाड यांनी योग्य ते मार्गदर्शन केले. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकऱ्याचा असूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्‌ऱ्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचितक व्यक्तिमत्त्व होते. महात्मा फुलेंनी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड इ. ग्रंथ लिहून सामाजीक प्रबोधन केले. मुलभूत मानवी हक्कांच्या आधारावरून विश्वकुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकारचे वर्तनक्रम व वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे हे ज्योतीराव फुलेंनी आपल्या सार्वजनिक सत्यधर्म संहितेत अनेक वचनांच्या आधारे  मांडली आहे.त्यानंतर वैद्य. अत्राम सर, वैद्य. शेलवले सर वैद्य. देशपांडे सर, वैद्य डोंगरे सर, वैदया.सुष्मिता बोरकर तसेच महाविद्यालयाचे उप प्राचार्य वैद्य. शिंपी सर आणि वैद्य. खंडिझोड सर यांच्या मार्गदर्शन खाली व्यवस्थित कार्यक्रम पार पडला.

विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली
गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले
वित्ताविना शुद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले