मांचीहिल संस्थान, मांचीहिल, आश्वी बु. ता. संगमनेर, जि. अहमदनगर येथे स्वतंत्र भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन व ध्वजारोहण समारंभ अतिशय उत्साहाच्या वातावरणात नुकताच पार पडला. लीलावती हॉस्पिटल, मुंबई येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छातीरोग तज्ञ डॉ. प्रल्हाद प्रभुदेसाई व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. वैशालीताई प्रभुदेसाई यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच गायन क्षेत्रात झी मराठी वाहिनीवरील सा रे ग म प लिटील चम्प २०२३ महाएपिसोडमध्ये प्रथम क्रमांक पटकाविणारी महाविजेती कु. गायत्री अलका पगारे हि विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होती. यावेळी संस्थेचे संस्थापक, मा.शाळीग्राम होडगर साहेब, विश्वस्त डॉ. शैलेन्द्रसिंह होडगर, सौ. शीलाताई होडगर, संचालिका नीलिमा गुणे, प्राचार्य डॉ. श्यामल निर्मळ , संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष , संचालक यांच्यासह संस्थेतील विविध विभागाचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक , शिक्षेकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
सदर प्रसंगी आथितींचे मार्गदर्शन, एन.सी.सी. मानवंदना , पारितोषिक वितरण व शैक्षणिक संकुलाच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या दोन दिवसीय मांचीहिल सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.