अश्विन रुरल महाविद्यालय, मांची हिल येथील द्वितीय वर्ष BAMS च्या विद्यार्थ्यांसाठी सिन्नर येथील गारगोटी संग्रहालय येथे भेटीचे आयोजन दि.१७/११/२०२२ रोजी करण्यात आले होते. रसशास्त्र व भैषज्यकल्पना या विषयांतर्गत असलेल्या खनिज द्रव्यांची प्रत्यक्ष ओळख होणे असा या भेटीचा उद्देश होता. त्यानुसार द्वितीय वर्ष BAMS चे ४९ विद्यार्थी या भेटीसाठी उपस्थित होते. रसशास्त्र व भैषज्यकल्पना विभागातील प्रपाठक वैद्य गौरव डोंगरे, सहाय्यक प्राध्यापक वैद्य आतीक मोमिन तसेच अध्यापकेतर कर्मचारी श्री संजय आंधळे हे यावेळी उपस्थित होते.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना निसर्गात खनिजांची उत्पत्ती कशा पद्धतीने होते तसेच महाराष्ट्र प्रदेशात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची खनिजे निर्माण होतात यांचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. रसशास्त्र विषयाच्या पुस्तकांमध्ये वाचलेली किंवा केवळ चित्रात पाहिलेली रसद्रव्ये यावेळी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बघायला मिळाली. या खनिजांचे संग्रहण कशा पद्धतीने केले जाते तसेच त्यासाठी काय काळजी घ्यावी लागते याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले.
या संग्रहालयामध्ये
अशा रसशास्त्रात उल्लेख असलेल्या विविध खनिजांचे प्रत्यक्ष दर्शन घडले. तेथील मार्गदर्शक व अन्य कर्मचारी यांनी सर्वप्रकारे सहकार्य केले. दिवसाच्या शेवटी विद्यार्थ्यांना या प्रत्यक्ष ज्ञानाचा अनुभव नक्कीच महत्वाचा असा ठरला.